कुणाल कामरान याने गायनातून वादग्रस्त विधान केल्याने कारवाई करण्यात यावी यासाठी दिले निवेदन…

प्रतिनिधी – शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र चे उपमुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे साहेब यांच्या बद्दल कुणाल कामरान याने गायनातून वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी यासाठी एरंडोल पारोळा मतदार संघाचे माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व एरंडोल पारोळा मतदार संघाचे आमदार अमोल पाटील यांच्या आदेशाने एरंडोल पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी निवेदन देताना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, तालुकाप्रमुख रवींद्र जाधव, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुदामतात्या राक्षे, तालुका संघटक संभाजी पाटील, माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन, व्यापारी आघाडी तालुकाप्रमुख परेश बिर्ला, एरंडोल शहर संघटक मयूर महाजन, शहर प्रमुख अतुल मराठे, युवा सेना शहर प्रमुख कृष्णा ओतारी, शिवसेना शहर समन्वयक पद्माकर मराठे, उपशहर प्रमुख गुड्डू जोहरी, तालुका विभाग प्रमुख छोटू मराठे, युवा सेना उपशहर प्रमुख राहुल ठाकूर, अमोल भावसार, सामाजिक कार्यकर्ते अतुल महाजन, अनिल महाजन, मोहन महाजन, प्रेम राज पाटील, दर्शन पाटील, भावेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य मोहन सैंदाणे, धनराज पाटील व तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.